मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींची घोषणा केली आहे. कसबापेठच्या भाजच आमदार मुक्ता टिकळ आणि पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम कसा?
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, ३१ जानेवारी २०२३ रोजी उमेदावारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल.
०७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल.
०८ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
१० फेब्रुवारी २०२३ रोजी शुक्रवारी अर्ज परत घेण्याची तारीख असेल.
२७ फेब्रुवारी २०२३ रोजी या जागांसाठीचं मतदान पार पडेल.
०२ मार्च रोजी मतमोजणी होईल.