Rakhi Sawant : मॉडेल राखी सावंतला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : मॉडेल राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. एका महिलेचा आपत्तीजनक व्हिडीओ शेअर केल्याचा राखीवर आरोप आहे. काही वेळेत अभिनेत्रीला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

अभिनेत्री शरलीन चोप्रानं यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. ‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतनं यासंदर्बात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’, अशी माहिती शरलीन चोप्रानं ट्वीटमध्ये दिली आहे.

Share