औरंगाबाद दुध संघाच्या उपाध्यक्षपदासाठी सेना-भाजपात जुंपली

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्हा दूध महासंघावर सर्वपक्षीय एकता पॅनलने विजया मिळवला आहे. आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून होते . अध्यक्षपदासाठी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नावावर सर्वानूमते संमती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता उपाध्यक्ष पदासाठी इतर पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. यात शिवसेना आणि भाजपात जास्त प्रमाणात रस्सिखेच दिसून येत आहे. शनिवारी ता.पाच रोजी अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठीची निवड होणार आहे. या संदर्भात चारही पक्षांची बैठकीनंतर निर्णय होणार असल्याचे राजकीय पक्षातर्फे सांगण्यात आले. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदापेक्षा उपाध्यक्षाच्या पदाला महत्त्व एकंदर दिसून येत आहे. उपाध्यक्षपद मिळावे म्हणून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांचा प्रयत्न सुरु आहे.

गेल्या वेळी शिवसेनेकडे असलेले हे उपाध्यक्षपद टिकविण्यासाठी शिवसेनेतर्फे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यात स्वत: कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे  लक्ष घालत असून त्यांचे निकटवर्तीय नंदलाल काळे यांच्याकडे उपाध्यक्षपद होते. मात्र यावेळी नवीन चेहरा असेल, असे काही संचालकांनी सांगितले आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष तयारीत आहेतच मात्र नवीन उपाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Share