राहुल गांधींनी पवारांकडून प्रेरणा घ्यायला हवी; पंतप्रधान

 नवी दिल्ली :  लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षावर जोरदार टिका केली. देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तर दुसरी कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कौतुक केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी राहूल गांधींचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. मात्र यावेळी शरद पवार यांच्याकडून त्यांनी काहीतरी धडा घ्यायला हवा, आजारी अजूनही ते मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देतात, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. २०१३ पर्यंत देशाने दुर्दशेत दिवस काढले. २०१४ मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना जुने दिवसच दिसणार नाही, अशी जोरदार टीका नरेंद्र मोदी यांनी केली. ते म्हणाले, सार्वजनिक जीवनात चढ-उतार येत असतात. त्यातून व्यक्तीगत निराशा निर्माण होते, ती देशावर थोपवू नये. सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि विरोधी बाकावर असताना देशाची चिंता करायची नाही, असं असतं का? कुणाकडून शिकता येत नसेल तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करत असूनही आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात. तुम्ही नाराज होऊ नका. नाराज होत असाल तर तुमचे जे मतदार संघ आहेत तिथले लोकही उदास होतील, अशी खिल्ली नरेंद्र मोदी यांनी उडवली. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख करत त्यांचे कौतुक केले.

Share