खा.संभाजीराजे – राऊत यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

दिल्ली- खा. छत्रपती संभाजीराजे यांनी संजय राऊत यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  मात्र हि भेट राजकीय नव्हती असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली असून या भेटीनंतर संभाजीराजे यांनी मीडियाशी संवाद साधला. संजय राऊत माझे जुने मित्र आहेत. आज चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून  त्यांच्या घरी आलो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं खा. संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या १५ मिनिटांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची चर्चा मात्र रंगली आहे. संभाजीराजे अचानक राऊतांना भेटण्यामागचे कारण काय? यामागे काही राजकारण आहे का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. तर, संभाजीराजे यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपत आल्याने या भेटीकडे पाहिले जात आहे.

मराठा आरक्षणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, आरक्षणात अनेक अडचणी आहेत, ते राज्य सरकार सोडू शकतात. या संदर्भातील निर्णय हे मराठा संघटना लवकरच घेतील आणि त्यांनी घेतलेल्या निर्णायवरच मी चालतो असंही ते यावेळी म्हणाले.

Share