पेगासस प्रकरणी राहुल गांधींची सरकारवर टीका

दिल्ली-  अमेरिकेतील वृत्तपत्र न्यूयाॅर्क टाइम्सन शुक्रवारी एका वृत्तामध्ये भारतानं इस्त्रायलकडून पेगासस स्पायवेअर खरेदी केल होतं असं या वृत्तात म्हंटल आहे. गेल्यावर्षी पेगासस हेरगिरी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनेक देशांतील नेते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे कॉल रेकॉर्ड होतं असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर विरोधकांनी या प्रकरणाला मोदी सरकारला जबाबदार ठरवल परंतू मोदी सरकारने सर्व आरोप फेटाळले होते. यावर आता सुप्रीम कोर्टातील शिष्टमंडळ चौकशी करत आहे.

दरम्यान या प्रकरणी विरोधकांकडून टिका होतं आहे. राहूल गांधींनी या बाबात ट्विट देखील केलं आहे. मोदी सरकारने संस्था, राजकीय नेते आणि जनतेवर पाळत ठेवण्यासाठी पेगासस सॉफ्टवेअर विकत घेत देशद्रोह केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला आहे.

ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात,मोदी सरकारनं आपल्या लोकशाहीच्या प्राथमिक संस्था, राजकीय नेते आणि जनतेवर हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली होती. फोन टॅप करून सत्ताधारी, विरोधक, लष्कर, न्यायापालिका सर्वांना लक्ष्य करण्यात आलं आहे. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारनं देशद्रोह केला आहे.

Share