“राज ठाकरे चूहा है”, भाजप नेत्यांचे वादग्रस्त विधान

उत्तर प्रदेश : भाजपचे खासदाप ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. उत्तर भारतींचा राज ठाकरेंनी अपमान केला आहे. त्यांनी अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी. अन्यथा त्यांना अयोध्यात घूसू दिले जाणार नाही. असा इशारा खा. ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. माझा विरोध मराठ्यांना नाही तर, राज ठाकरेंना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मी आदर्श मानतो असंही ब्रिजभूषण सिंह म्हणाले.

दरम्यान खा. ब्रिजभूषण सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, उत्तर भारतीयांना विरोध करणारे कधीच येथे घुसू शकत नाही. मला मंत्री, नेता व्हायचं नाही आहे. मला द्यायचं तेवढं देवाने, पक्षाने आणि जनतेने दिलं आहे. जर उत्तर भारतीयांवर पुन्हा हात उचलला तर आम्ही शांत बसणार नाही, महाराष्ट्रात पोहोचू. ते दिवस आता संपले आहेत जेव्हा उत्तर भारतीयांना मारहाण केल्यानंतर काँग्रेस पक्ष त्यांना संरक्षण देत होतं. आता त्यांना सुरक्षा मिळणार नाही. कोणतीही व्यक्ती धर्मविरोधी, देश तोडणारं वक्तव्य करत असेल तर पोलिसांनी त्यांची सुरक्षा हटवली पाहिजे, असं बृजभूषण शरण सिंह म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझं म्हणणं ऐकलं नाही, माफी मागितली नाही तर मी वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत”. मला मराठ्यांचं समर्थन आहे असा दावाही यावेळी त्यांनी केला. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो असंही म्हणाले. राज ठाकरेंचा विरोध आहे, मराठ्यांचा नाही असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे यांनी सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सार्वजनिकरीत्या हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच अयोध्येत प्रवेश करावा, अशी बृजभूषण सिंह यांची मागणी आहे.

Share