राज ठाकरेंची ‘उत्तर’ सभा, काश्मिरमध्ये पंडीतांकडून सभेच थेट प्रक्षेपण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ‘उत्तर’ सभा आज संध्याकाळी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राज ठाकरेंच्या या सभेकडे लागलेले आहे. गुढीपाडव्याच्या वेळी शिवतीर्थावरुन केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्यावरुन मोठ राजकारण तापलं होत. याच मुद्द्यावरुन अनेकांनी राज ठाकरेंवर टिका केली होती. तर अनेकांनी त्यांंच्या या वक्तव्याच समर्थन देखील केल होत. त्यामुळे आजच्या होणाऱ्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेल आहे.

राज ठाकरेंनी भोंग्यांचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्यानंतर आता काश्मिरी पंडीतांनाही राज ठाकरेंची भुरळ पडल्याचे दिसत आहे. काश्मिरी पंडीत राज ठाकरेंची सभा लाईव्ह दाखवणार आहेत. जम्मूतील काटरा याठिकाणी ही सभा  लाईव्ह दाखवली जाणार आहे. तसेच काश्मिरी पंडीतांनी राज ठाकरेंचे पोस्टर देखील लावले आहे. ज्यावर, ‘हिंदूजननायक राजसाहब ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याची सर्वांना उत्कंठा लागली आहे.

राज ठाकरे यांची सभा आज ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या बाजूला होणार आहे. या सभेसाठी रात्रीपासूनच जय्यत तयारी सुरू आहे. सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. तसेच सभेतील परिसर ते ठाणे स्टेशनपर्यतच्या परिसरात राज ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. हा संपूर्ण परिसर राज ठाकरेमय झाला आहे. या सभेला ठाण्यासह मुंबई आणि नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीतून हजारो मनसेसैनिक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

Share