बंडखोर आमदार संतोष बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बंगार यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का दिला असुन बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. संतोष बंगार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठा म्हणून ओळख होती. मात्र बंगार यांनी बंडखोरी करत शिंदे गटात समील होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी बंगार यांना मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. कालच सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आज आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. याशिवाय, शिवसेनेने कोकणातील माजी मंत्री आ. उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले आहे.

दरम्यान, संतोष बांगर हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान सुद्धा केलं होतं. मात्र बहुमत चाचणीआधी त्यांनी अचानक बंडखोरी केली. त्यांनी बदलेल्या भूमिकेमुळे अनेकांना धक्का बसला होता.

Share