टिपू सेनेचे चारित्र्य ओळखूनच MIM चा प्रस्ताव – भातखळकरांचा

मुंबई- एमआयएमकडून राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ‘ऑफर’ देण्यात आल्यानंतर त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. एकीकडे भाजपानं यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे, तर दुसरीकडे संजय राऊतांनी शिवसेनेच्या वतीने ही ऑफर धुडकावून लावली आहे.  त्यातच भाजप आमदार अतुल भातखळकरांनी आघाडीची टिपू सुलतान सेने सोबत तुलना करत टोला लगावला आहे.

भातखळकारांनी ट्विट करत राज्यातील महाविकास आघाडीची टिपू सुलतान सेने सोबत तुलना करत एमआयएमच्या ऑफऱ बद्दल खोचक टोला लगावला आहे. तसेच शिवसेना आता हरवी धालीय असं देखईल त्यांनी म्हंटल आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची तथाकथित सेक्युलर नव शिवसेना आहे. अशा शब्दात आघाडी सरकारवर आणि सेनेवर निशाणा साधला आहे.

Share