मलिकांनी मुंबईत, शिवसेना भवनात बाँम्ब घडवून आणले भाजप आमदाराचा आरोप 

मुंबई- नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.अटकेमुळे भाजपा राजीनाम्यासाठी आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.यातच भाजप आमदार श्वेता महाले यांनी मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्या टि व्ही नाईन मराठीशी बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, नवाब मलिकांनी मुंबईत, शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणले. आणि त्याच नवाब मलिकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे आले आहेत असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे. श्वेता महाले यांनी यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेससोबत गेली त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्वाला लाथ मारली असं त्या म्हणाल्या आहेत.

ज्या नवाब मलिकांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणलेत, शिवसेना भवनामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. त्या मलिकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. यापेक्षा वेगळं पाहण्याची गरज नाही. उद्याला एमआयएम जरी यांच्यासोबत आली तरी आश्चर्य वाटण्यासारखं त्यात काही नाही, असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे ढोंगीपणाचं आहे, ते फक्त बोलण्यामध्ये दिसतं, प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांचं हिंदुत्व कुठेही राहिलेलं नाही. ते हिंदुत्व बाळासाहेबांसोबत निघून गेलं आहे, असं म्हणत  श्वेता महालेंनी सेनेवर सडकून टिका केली आहे.

Share