समीर वानखेडेंना दिलासा, नवाब मलिकांना झटका

मुंबई : एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना झटका बसला आहे. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे अनुसूचित जातीतील असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. मलिक यांनी वानखेडे यांनी खोटी जात लावल्याचा आरोप केला होता. याबाबत मलिक यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नाहीत. समीर वानखडेंच्या वडिलांनी हिंदु धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्माचा स्विकार केल्याचे सिद्ध होत नाही. समीर वानखडे हिंदु महार ३७ अनुसुचित जातीचे असल्याचे सिद्ध होत आहे. समीर वानखडेंविरोधात केलेली तक्रार सिद्ध होत नसल्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वानखेडेंलविरोधातली तक्रार फेटाळली आहे.

 

नवाब मलिक यांनी काय केला होता आरोप?

एनसीबी संचालक समीर वानखेडे हे हिंदू महार नाही तर मुस्लीम असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. समीर वडील ज्ञानदेव का दाऊद ? या उपस्थित केलेला सवाल ? जातीचे खोटे पुरावे देऊन समीर वानखेडे केंद्र सरकारच्या सेवेत दाखल झाल्याचा, आरोप मलिक यांनी केला होता. समीर दाऊद वानखेडे का समीर ज्ञानदेव वानखेडे ? ज्ञानदेव वानखेडे हे दाऊद वानखेडे कसे ? आज सरकारी रेकॉर्डवर, समीर हिंदू महारजन्म झाला. वडील हिंदू का मुसलमान ? समीर यांचा जन्म झाला तेव्हाच्या कागदावर समीर मुसलमान नंतर सरकारी नोकरी कागदावर समीर नवबौद्ध असल्याचा उल्लेख होता. मलिक यांनी याबद्दल वानखेडे यांच्या वडिलांचे कागदपत्र सुद्धा दाखवली होती.

Share