काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ‘काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कोविड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार त्या आयसोलेशनमध्ये राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 

दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना देखील पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: प्रियांका यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती. त्यांनी स्वत:ला घरीच आयसोलेट करुन ठेवले आहे. दरम्यान राहुल गांधी यांना देखील अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी अलवर दौरा रद्द केला होता. सोनिया गांधी यांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. तर प्रियंका गांधी यांना देखील दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. २ जून २०२२ ला सोनिया गांधी यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

Share