संजय राऊतांना ईडीकडून दिलासा; आता ‘या’ तारखेला राहणार हजर

मुंबई : कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र राऊत सध्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आज चौकशीला उपस्थिती राहू शकले नाही. संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना ७ ऑगस्टपर्यंत सूट मागितली आहे, जी ईडीने मान्य केली आहे. संजय राऊत सात ऑगस्टनंतर ईडीसमोर हजर राहणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांचे वकील विक्रांत सापने यांनी दिली.

दरम्यान, मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.

याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये अटॅच केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली

Share