औरंगाबाद मनपा निवडणूकीची जबाबदारी ‘या’ बड्या नेत्यावर

औरंगाबाद-  राज्यात काही दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणुका येवून ठेपल्या आहेत. राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप तयारीला लागली आहे. या संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीत येणाऱ्या पालिका निवडणुकासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून औरंगाबाद महानगरपालिकेची जबाबदारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कारड यांच्यावर देण्यात आली आहे.

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिकेची जबाबदारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच कराड यांच्या समावेत आमदार अतूल सावे हे देखील नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणूकीत कोणाला मनपाची उमेदवारी दिली जाते आणि कोणाला डावले जाते हे पाहाणे महत्वाचे ठरेल.

जिल्हानिहाय जबाबदारी –

ठाणे महानगरपालिका – निरंजन डावखरे

नागपूर महागरपालिका – सुधीर मुंनगंटीवार

उल्हासनगर महापालिका – कुमार ऐलानी

कोल्हापूर महापालिका – धनंजय महाडीक

सोलापूर महापालिका – विजय देशमुख

पुणे महानगरपालिका – राजेश पांडे

चंद्रपूर महापालिका – चंद्रशेखर बावनकुळे

पिंपरी महानगरपालिका – माधुरी मिसाळ

नाशिक महापालिका – गिरीश महाजन

सहप्रभारी महापालिका – प्रभारी जयकुमार रावल

औरंगाबाद महापालिका – डॉ. भागवत कराड

लातूर महापालिका – संभाजी निलंगेकर

परभणी महापालिका – बबनराव लोणीकर

अकोला महापालिका – रणधीर सावरकर

 

Share