दिल्ली- भारताची लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन २२ मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर सानिया मिर्झाने बुधवारी तिच्या निवृत्तीची घोषणा केली. मिर्झा आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांना तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांच्या स्लोव्हेनियन संघाकडून एक तास ३७ मिनिटांत ४-६, ६-७(५) असा पराभव पत्करावा लागला. सानिया मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसोबत खेळणार आहे.
पराभवानंतर, सानिया मिर्झाने घोषित केले की २०२२ हे तिच्या दौर्यातील शेवटचे सीझन असेल आणि तिला तो खरोखर पूर्ण करायचा आहे. हा माझा शेवटचा सीझन असेल हे मी ठरवले आहे. मला हा पूर्ण सीझन खेळायचा आहे. पण तोवर मी टिकेन की नाही माहित नाही”, असं सानिया मिर्झाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.