मुंबई : राज्यसभेत अखेर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले. कोल्हापुरच्याच दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. यात भाजपचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. तर शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. या निवडणूक निकालानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. या माणसात बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचं टॅलेंट आहे, अशी बिचारी टिका राणेंनी शरद पवारांवर केली आहे.
शरद पवारांनी राज्यसभा निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या गटात असे अनेक लोक आहेत की, ज्यांच्यासोबत मी कधीकाळी काम केलं आहे. मी एखादा शब्द टाकला तर नाही बोलायची त्यांची तयारी नसते. पण मी त्यात पडलो नाही, असं पवार म्हणाले. यावरून निलेश राणेंनी पवारांवर बोचरी टीका केलीये.
या माणसात बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचे टॅलेंट आहे, मतांचा कोटा पवारसाहेबांनीच वाढवला आणि आता म्हणतात मी त्यात पडलो नाही. आज उद्धव ठाकरेंना कळलं असेल स्व. बाळासाहेब पवार साहेबांबद्दल किती अचूक बोलायचे आणि समजायचे. https://t.co/qPtG5mb1DP
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 11, 2022
निलेश राणेंनी यासंदर्भात ट्विट मध्ये म्हटलं की, या माणसात बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचे टॅलेंट आहे, मतांचा कोटा पवारसाहेबांनीच वाढवला आणि आता म्हणतात मी त्यात पडलो नाही. आज उद्धव ठाकरेंना कळलं असेल स्व. बाळासाहेब पवार साहेबांबद्दल किती अचूक बोलायचे आणि समजायचे.असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.