शिवसेनेनं ‘मशाल’ चिन्हावर घडवला होता इतिहास..

मुंबई : काल निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे पक्षाचे नाव मान्य करत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. याच पार्श्‍वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तत्कालीन ‘मशाल’ चिन्हाशी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आठवणी संलग्न आहेत. २ मार्च १९८५ ला शिवसेनेचे उमेदवार आणि तेही ‘मशाल’ चिन्हावर माझगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. शिवाय या निवडणुकीत ते प्रचंड मताधिक्याने निवडून येत शिवसेनेचे पहिले आमदार देखील झाले होते.

काय आहे मशाल चिन्हाचा इतिहास?

शिवसेना प्रमुख, मा. बाळासाहेब ठाकरे यांनी १९७२ साली माझगांव विभागातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मला उभे केले. जनतेने मला निवडूनही दिले. १९७८ साली महापालिकेची दुसरी निवडणूक झाली. पहिल्या पांच वर्षाच्या माझ्या कामाची पोचपावती म्हणून मतदार बंधु-भगिनींनी माझ्या मतांच्या पेटया भरभरुन टाकल्या आणि अनेक रथी-महारथी विरोधकांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. एवढे प्रेम व जिकाळा माझगांवच्या जनतेने मला दिला आहे. या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला.

या कालखंडामध्ये आपल्या भागातील नागरिकांना विविध सुविधा देण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला. माझ्या चाहत्यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत याची चित्रमय झलक आपण पहालच. महानगरपालिका सभागृहात विविध समस्यांवर भी आवाज उठविला. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेळोवेळी उद्भवलेल्या अनेक प्रश्नांचा उहापोह केला. मग तो रॉकेल टंचाई अमी की बेळगांव कारवार प्रश्न असो, किया गिरणी कामगारांचा प्रश्न असो, किंवा “बॉम्बे” ऐवजी “मुंबई” हे नांव प्रचारात आणण्याचा प्रश्न असो. अशा विविध प्रश्नांना मी महापालिकेच्या माध्यमातून तसेच सार्वजनिक व्यासपिठावरून वाचा फोडली आहे. माशी ही भरीव कामगिरी पाहून मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापालिका शिवसेना गटाचा नेता नेमले. मुंबई महानगरपालिकेनेही माझ्या कार्याचा गौरव म्हणून अनेक महत्वांच्या संस्थांवर माझी नियुक्ती केली, इतकेच नव्हे तर तीन मुंबई महानगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून मला परदेशी अभ्यासदौयावर पाठविले.

बेळगांव-कारवार सीमा प्रश्न, बस भाडे वाढ, दूधभाव बाद अशा अनेक जन आंदोलनात अग्रभागी राहून मी प्रसंगी कारावासाची शिक्षा भोगली. अशा प्रकारे केवळ नागरी सुख-सोयी बाबतच नव्हे तर समाजातील अन्य विनय कार्यामध्ये मी सक्रीय भाग घेतला. म्हणूनच शिवसेनेने माझगांव विभागातून विधान सभेकरिता माझी उमेदवारी जाहीर केली आहे.

Share