नवनीत राणा विरोधात शिवसेना पुन्हा आक्रमक

मुंबई : हनुमान चालिसा प्रकरणी न्यायालयीन कोठडीतून सुटल्यावर प्रकृती खालावल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा दोन दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. तेव्हापासून राणा यांचे रुग्णालयातील अनेक छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. आता या फोटोच्या मुद्द्यावरन शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास धारेवर धरलं आहे.

दरम्यान आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे यांच्यासह शिवसेना नेते आज लिलावती रुग्णालयात जाऊन धडकले. त्यांनी रुग्णालय प्रशासनास विविध प्रश्न विचारून जोपर्यंत याचे उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून हलणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

नवनीत राणा यांचा खरच एमआरआय झाला आहे का?, एमआरआय करताना व्हीडीओ शुटींग आणि फोटो कसे काढले गेले? रुग्णलायाचे नियम सर्वांना समान हवेत. त्यांचा तपासण्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत. असं म्हणत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं आहे. रुग्णालयात फोटोग्राफी आणि शुटींग करण्यासाठी कोणी दबाव आणला आहे का? याचा तपास झाला पाहिजे. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी माध्यमांना दिली.

Share