‘बाप’ हाेण्‍याचा आनंद ‘आयपीएल’पेक्षा भारी…शिमरॅान हेटमायर परतला मायदेशी

मुंबई : आयपीएल क्रिकेटमधील राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गाेलंदाज शिमरॅान हेटमायर हा आयपीएलचा सीजन सुरू असतानाच मायदेशी वेस्‍ट इंडिजला परतला आहे. हेटमायर ही स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी जाण्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. शिमरॅान हेटमायरची पत्नी गर्भवती असून, लवकरच तिची प्रसूती हाेणार आहे. जीवनातील या अविस्‍मरणीय क्षणी पत्‍नीला साेबत करण्‍यासाठी हेटमायरने यंदाच्‍या आयपीएल सीझनवर पाणी साेडले आहे.

शिमरॉन हेटमायरची पत्नी निर्वाणी ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. याशिवाय ती बिझनेस वुमनही आहे. २०१९ मध्ये निर्वाणी आणि हेटमायर यांचा विवाह झाला आहे. हेटमायरची पत्नी निर्वाणी ही वेस्ट इंडिजच्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानली जाते. तिच्या सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत. साेशल मीडियावरही ती नेहमी चर्चेत असते. निर्वाणी ही वेस्ट इंडिजमधील एका बड्या उद्योगपतीची मुलगी आहे. सध्या निर्वाणी ही गर्भवती असून, लवकरच तिची प्रसूती हाेणार आहे. या काळात निर्वाणीला साथ देण्‍यासाठी हेटमायर आयपीएल-२०२२ चा हंगाम अर्धवट साेडून नुकताच मायदेशी परतला आहे.

आयपीएल-२०२२ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या शिमरॉन हेटमायर याने आतापर्यंत उत्कृष्ट खेळी केली आहे. हेटमायर अखेरच्‍या षटकांमध्ये धमाकेदार फलंदाजी करतो. काही काळासाठी ताे मायदेशी परतला आहे. लवकरच आपण पुन्‍हा आयपीएल खेळणार असल्‍याचे त्‍याने म्‍हटले आहे. राजस्‍थान राॅयल प्‍ले ऑफमध्‍ये पाेहोचल्‍यास हेटमायर पुन्‍हा मैदानात उतरेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

Share