शिंदे गटाकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकरणी बरखास्त केली आहे. यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र शिंदे गटाने हात लावलेला नाही.

आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आता तर खासदार सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे १४ खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे.

Share