धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; २००हून अधिक लोक रुग्णालयात दाखल

माधव पिटले / निलंगा : लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना केदारपूर गावात घडली आहे. लग्नात आलेल्या २०० हून अधिक वऱ्हाडी मंडळींना अन्नातून विषबाधा झाली आहे. केदारपूर गावात रविवारी (२२ मे ) दुपारी एक लग्नसोहळा पार पडला. यात लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्नात जेवणं महाग पडलं आहे. जेवण झाल्यानंतर अनेकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

केदारपूर येथे रविवारी दुपारच्या सुमारास विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यात अनेकांनी जेवणावर ताव मारला. जेवणानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला. विषबाधा झालेल्या सर्व वऱ्हाड्यांवर वलांडी येथील प्राथमिक आयोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. विषबाध झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. आता या वऱ्हाडी मंडळींची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या लग्नसोहळ्यात झालेल्या अन्न विषबाधेमुळे लग्नात आलेल्या वऱ्हाडींना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Share