धक्कादायक; दोन सख्ख्या बहिणीचा विहिरीत पडून मृत्यू

बिदर : भालकी जिल्ह्याच्या आट्टरगा येथील रहिवासी असणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी दोन सख्ख्या बहिणींचा अशाप्रकारे हृदयद्रावक शेवट झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद मेहकर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अंकिता गोविंदराव मोरे (वय १५) आणि श्रद्धा गोविंदराव मोरे (वय १०) असं मृत पावलेल्या सख्ख्या बहिणींची नावं आहेत.  दरम्यान घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. या मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनेचा तपास सुरू असून, घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Share