नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-२०२१ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी या परीक्षेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दिल्ली येथील जेएनयूची माजी विद्यार्थिनी श्रुती शर्मा ही या परीक्षेत प्रथम आली आहे, तर अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला या महिला उमेदवारांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रीयन प्रियंवदा म्हाद्दळकर ही महाराष्ट्रातून पहिली आली असून, देशातून तिचा १३ वा क्रमांक आला आहे. ऐश्वर्या वर्मा हिने ऑल इंडिया ४ था रँक मिळवला आहे.
देशाची पहिली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल आज सोमवारी (३० मे) जाहीर झाला. या परीक्षेमध्ये दिल्लीची श्रुती शर्मा अव्वल ठरली आहे. श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. नागरी सेवा परीक्षा-२०२१ परीक्षेत एकूण ७४९ उमेदवार यशस्वी झाले आहेत. या परीक्षेच्या अंतिम निकालामध्ये एकूण ६८५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय तात्पुरत्या निवडीसाठी ८० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. एका उमेदवाराचा निकाल आता रोखण्यात आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने १७ मार्च रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ आयोजित केली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. या परीक्षेच्या माध्यमातून नागरी सेवेतील ७१२ पदे भरली जाणार आहेत.
हे आहेत पहिले दहा टॉपर्स
१) श्रुती शर्मा
२) अंकित अग्रवाल
३) गामिनी सिंगल
४) ऐश्वर्या वर्मा
५) उत्कर्ष द्विवेदी
६) यक्ष चौधरी
७) सम्यक सा जैनी
८) इशिता राठी
९) प्रीतम कुमार
१०) हरकीरत सिंह रंधावा
महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी
१) प्रियंवदा म्हाद्दळकर (१३ वा रॅंक)
२) ओंकार पवार (१९४ वा रॅंक)
३) शुभम भोसले (१४९ वा रॅंक)
४ ) अक्षय वाखारे (२०३ वा रॅंक)
५ ) अमित लक्ष्मण शिंदे (५७० वा रॅंक)
६) पूजा खेडकर (६७९ वा रॅंक)
७) अमोल आवटे (६७८ वा रॅंक)
८) आदित्य काकडे (१२९ वा रॅंक)
९) विनय कुमार गाडगे (१५१ वा रॅंक)
१०) अर्जित महाजन (२०४ वा रॅंक)
११) तन्मय काळे (२३० वा रॅंक)
१२) अभिजित पाटील (२२६ वा रॅंक)
१३) प्रतीक मंत्री (२५२ वा रॅंक)
१४) वैभव काजळे (३२५ वा रॅंक)
१५) अभिजित पठारे (३३३ वा रॅंक)
१६) ओमकार शिंदे (४३३ वा रॅंक)
१७) सागर काळे (२८० वा रॅंक)
१८) देवराज पाटील (४६२ वा रॅंक)
१९) नीरज पाटील (५६० वा रॅंक)
२०) आशिष पाटील (५६३ वा रॅंक)
२१) निखील पाटील (१३९ वा रॅंक)
२२) स्वप्नील पवार (४१८ वा रॅंक)
२३) अनिकेत कुलकर्णी (४९२ वा रॅंक)
२४) राहुल देशमुख (३४९ वा रॅंक)
२५) रोशन देशमुख (४५१ वा रॅंक)
२६) रोहन कदम (२९५ वा रॅंक)
२७ ) अक्षय महाडिक (२१२ वा रॅंक)
२८) शिल्पा खनीकर (५१२ वा रॅंक)
यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in येथे हा निकाल पाहता येईल. उमेदवारांचे वैयक्तिक गुण निकालानंतर १५ दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत.
मला ‘आयएएस’ होऊन देशाची सेवा करायचीय : श्रुती शर्मा
दरम्यान, दिल्लीच्या श्रुती शर्माने युपीएससी नागरी सेवा परीक्षा-२०२१ मध्ये अखिल भारतीय रँक (AIR १) मिळवला आहे. या यशाने आनंदित झालेली श्रुती शर्मा म्हणाली, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण मला होण्याचा विश्वास होता; परंतु गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळणे आश्चर्यकारक आहे. मला भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) रुजू होऊन देशाची सेवा करायची आहे.
श्रुती शर्माने दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) प्रवेश घेतला होता. श्रुती शर्मा हिने जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमी येथे नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. श्रुती शर्मा हिच्यासह एकूण २३ उमेदवार जामिया आरसीएमधून नागरी सेवा परीक्षेत पात्र झाले आहेत.