सिद्धार्थ मल्होत्राच्या पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष….

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही बी-टाऊनमधील जोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कियारा-सिद्धार्थ यांचे नेहमीच एकत्रित फोटो व्हायरल होताना दिसतात. या दोघांमध्ये नक्की काय नातं आहे याबाबत अनेक तर्क लावले जातात. कियारा-सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या फक्त चर्चा आहेत. मात्र रिलेशनशिपबाबत चर्चा सुरु असताना दोघांनीही मौन पाळणं पसंत केलं. आता तर कियारा-सिद्धार्थचं ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

https://www.instagram.com/p/Cc522SHtPNA/?utm_source=ig_web_copy_link

ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धार्थने “फिलिंग गुड” म्हणत स्वतःचे स्टायलिस्ट फोटो शेअर केले आहेत, काही तासांमध्येच त्याच्या हा पोस्टला चांगलीच पसंती नेटकऱ्यांनी दिली आहे.

Share