‘सितारे जमीन पर’; Amir Khan

‘सितारे जमीन पर’च्या सेटवरून समोर आले आमिर अन् जेनेलियाचे छायाचित्र
आमिर खान अखेरच्या वेळी ‘लाल सिंह चड्डा’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटानंतर या अभिनेत्याने अभिनयापासून दीड वर्षाचा ब्रेक घेतला होता. आता आमिर लवकरच ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात दिसेल. हा आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नुकतीच त्याने या चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. चित्रपटाबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र, कलावंतांबाबत इतका गौप्यस्फोट झाला आहे की, या चित्रपटात जेनेलिया डिसुझाही झळकणार आहे. चित्रपटाच्या सेटवरील दोघांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृत्तानुसार, ‘सितारे जमीन पर’मध्ये आमिर बास्केटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. तो शिक्षणात सक्षम नसलेल्या लोकांना ऑलिम्पिकसाठी तयार करेल. अभिनयासह आमिर निर्मितीही करणार आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली ‘लाहोर १९४७’ची निर्मिती होत आहे. याचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत. यामध्ये सनी देओल प्रमुख भूमिकेत आहे. तथापि, या चित्रपटातून प्रीती झिंटाही मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. नुकतीच याची शूटिंगही सुरू झाली. यामध्ये आमिर कॅमियों करताना दिसू शकतो.

या चित्रपटाविषयी बोलताना आमिर खान म्हणाला की, ‘मी आता याविषयी जास्त काही बोलू शकणार नाही. पण हा मी या चित्रपटाचे शीर्षक काय असणार हे नक्कीच सांगू शकतो. ‘सितारे जमीन पर’ हे या चित्रपटाचे शीर्षक असणार आहे. ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. आता या चित्रपटाचे नावही त्याच्याशी मिळते जुळते असणार आहे. ‘सितारे जमीन पर’मध्ये ही थीम आता आणखी १० पावले पुढे जाणार आहे. ‘तारे जमीन पर’ची थीम भावनात्मक होती, पण आता हा चित्रपट तुम्हाला हसवणार आहे. त्या चित्रपटाने तुम्हाला रडवले होते, हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल. मागच्या चित्रपटात मी इशान नावाच्या मुलाला मदत केली होती. मात्र, आता ९ मुले मला मदत करणार आहेत.’

Share