सातारा : सैन्य जर सोबत असेल तर कोणतीही लढाई सहजरीत्या जिंकू शकतो. त्यामुळे सक्षम बूथ बांधणी करुन सैन्य निर्माण केले पाहिजे असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. ते राष्ट्रावादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात सातारा जिल्ह्यातील कराड येथे बोलत होते. तसेच पक्षाची सभासद नोंदणी करताना तालूक्यातील सर्व स्तरावरील लोकांना सहभागी करुन घ्यायला हवे असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी या बैठकीला खा. श्रीनिवास पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, महेबूब शेख जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती जिल्हाध्यक्ष पूजा काळे, सुहास कदम, स्मिता देशमुख, राजकुमार पाटील, देवराज पाटील, संतोष पाटील आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. #राष्ट्रवादीपरिवारसंवाद #NCP pic.twitter.com/koO56RNY0K
— NCP (@NCPspeaks) February 28, 2022
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, पक्षात काम करताना पक्षाची भूमिका प्रत्येक गावातील जनतेपर्यंत पोहचायला हवी. यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. असे पाटील म्हटले आहे.