युध्दाचे परिणाम आता क्रिडा क्षेत्रावर, रशियाची कोंडी !

कतार-  रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेला वाद आता फुटबाॅल खेळावर उमटला आहे. रशियाने युक्रेनवर युध्द पुकारल्याने रशियाची जगभरातून कोंडी केली जात आहे. कतार येथे आयोजित फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा 2022 होणार आहेत. त्यामुळे युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाला आता जगभरातून निषेध दर्शवण्यात येत असून विविध क्रीडा संघटनांनीही आता त्यांची कोंडी करण्यास प्रारंभ केला आहे.

फिफाच्या निवेदनात म्हंटले आहे की , रशियाला स्पर्धे दरम्यान राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.तसेच युध्दजन्य परिस्थिती अटोक्यात येत नाही तो पर्यंत रशियन फुटबाॅल संघाला निलंबित करण्याचा निर्य़ण घेण्यात आला आहे. यामुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

तसेच बऱ्याच देशांनी रशिया विरूध्द खेळण्यास नकार दिला आहे. यामध्ये पोलंडसह इंग्लंड, स्वीडन आणि अल्बेनिया यांसारख्या देशांनी रशियाविरुद्ध फुटबॉल सामने खेळण्यास नकार दिला आहे.या वर्षांअखेरीस कतार येथे ‘फिफा’ विश्वचषक होणार असून या स्पर्धेच्या पात्रता फेरीत रशिया आणि पोलंड यांच्यात प्ले-ऑफचा सामना रंगणार होता. या सामन्यातील विजेत्याला स्वीडन किंवा चेक प्रजासत्ताक यांच्याशी दोन हात करावे लागणार होते. मात्र, हे सर्वच संघ रशियाविरुद्ध खेळण्यास तयार नसल्याने ‘फिफा’च्या अडचणी वाढल्या आहेत.

 

Share