…तर मी एकनाथ शिंदेंचं टेबलवर उभं राहून स्वागत करेन – रामदास आठवले

नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला आपल्या पक्षात विलीन होण्याची खुली ऑफर दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचा गट आपल्या पक्षात आला तर मी टेबलवर उभं राहून त्यांचं स्वागत करेन, अशी मिश्किल प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंद होईल. शिवसैनिक माझ्या पक्षात आले तर टेबलवर उभं राहून मी त्यांचं स्वागत करेन. पण शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल. खरी शिवसेना शिंदेंची आहे, बरी शिवसेना ठाकरेंची आहे”, असं रामदास आठवले म्हणाले. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात आरपीआयला एक मंत्रीपद देण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.़

दरम्यान, राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये विस्तारासाठी तांत्रिक अडचण असतील, पण विस्तार आणि अधिवेशन झालं पाहिजे असे आठवले म्हणाले आहेत. तर येथे आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन होऊ शकेल, असं भाकीत ही आठवले यांनी वर्तवलं आहे. त्याचबरोबर या नव्या मंत्रिमंडळात रिपाईला एक मंत्रीपद हवं, अशी मागणी ही त्यांनी भाजप समोर आणि एकनाथ शिंदे यांच्या समोर ठेवली आहे.

Share