…तर नांदेड, लातूरकर भाजपच्या मांडीवर बसायला तयार – प्रकाश आंबेडकर

नांदेड : शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असं मोठं विधान वंचित बहूनजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. नांदेडमध्ये सुरू असलेल्या धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं.

राज्यातील शिंदे सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यापैकी १६आमदार बरखास्त झाले तर देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी तयार असल्याची चर्चा आहे. हाच धागा पकडत ते म्हणाले, १६ आमदार बरखास्त झाले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, असं अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबडेकर पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांना प्रकाश आंबेडकर यांनी प्रेमाचा सल्ला देखील दिला आहे.भारत जोडो यात्रा काढत आहात.त्याबद्दल विश्वास निर्माण केलात त्याबद्दल आपलं दुमत नाही.पण ही भारत जोडो यात्रा म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे.यात्रा आहे तो पर्यंत हा बुडबुडा आहे.यात्रा संपली की हा बुडबुडा फुटणार आहे.मग पुन्हा सुब्रमण्यम स्वामी लोकांना दिसणार असा टोला देखील अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

Share