मुंबई- कालपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने ताब्यात घेतले आणि जवळपास ८ तास चौकशी करून अटक केली आहे. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयाच हजर देखील करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने मलिकांना कोठडी सुनावली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकात चांगलेच राजकारण तापले असून यावर नितेश राणे यांनी ट्विट करत भगव्याची जबाबदारी आता आमची असं सूचक ट्विट केलं आहे.
९३ च्या दंगली नंतर मुंबई मा.बाळासाहेबांनी वाचवली..
आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना ९३ च्या दंगलीतील आरोपींना वाचवतो आहे..म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची!!!
— nitesh rane (@NiteshNRane) February 24, 2022
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, १९९३ साली झालेल्या दंगली नंतर मुंबईकरांना स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांनी वाचवले होते, त्यांना मदतीला धावून गेले होते. त्यांचाच मुलगा आज मुख्यमंत्री म्हणून आहे मात्र ९३ सालच्या दंगलीतील आरोपींना ते आता वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आता भगव्याची जबाबदारी आमची आहे , असं सुचक ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.