महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का

पिंपरी चिंचवड : आगामी महापालिका निवडणुक प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यापासून शहरात नाट्यमय राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. महापालिकेतील सत्ता राखण्याच्या प्रयत्नात असलेला सत्ताधारी भाजपला आठवड्याभरात तिसरा धक्का बसला आहे. भाजपचे पिंपळे निलख भागाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पिंपरतील भाजपला लागलेल्या गळतीबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
यापुर्वी भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा देऊन भाजपला  पहिला धक्का दिला होता. विकासकामं करण्याचं स्वातंत्र्य नाही. नगरसेवकांनी काम करायचं आणि त्याचे श्रेय वरिष्ठांनी घ्यायचं अशी पद्धत आहे, असा थेट आरोप करत भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीची वाट धरली होती. बोरोटे यांच्यापाठोपाठ पिंपळे गुरव मधील चंदा लोखंडे आणि आता तुषार कामठे यांनीही आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता.
Share