… तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चप्पलेने मारतील – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळला आहे. काल संजय राऊत यांनी नारायण राणेंचा एकेरी उल्लेख केल्यानंतर आज नारायण राणे चांगलच आक्रमक झाल्याच पाहिला मिळले. ते मुंबईत प्रसामाध्यमांशी बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत हे माझ्याकडे आले आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलले, ते मी उद्धव यांना एकदा भेटून सांगणार आहे. मी ते सांगितल्यानंतर उद्धव आणि रश्मी हे दोघेही राऊतांना चप्पलेने मारतील, असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी शिवसेना वाढवली नाही, तर शिवसेना संपवली आहे. हा व्यक्ती मातोश्रीला सुरुंग लावणारा आहे. ते ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळलाच म्हणून समजा.असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला पुन्हा संजय राऊतांबद्दल विचारू नका,असंही राणेंनी नमूद केलं आहे.

Share