ठाकरे सरकारच्या ‘डर्टी डझन’ नेत्यांची यादी घेऊन सोमय्या दिल्लीत दाखल

मुंबई : भाजचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील  १२ नेत्याची यादी जाहीर केली आहे. या यादीतील नेत्यांच्या नावाचा उल्लेख किरीट सोमय्या यांनी “डर्टी डझन” असा केला आहे. तसेच या नेत्यांवर सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले आहेत.  या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत यांच्याही नावाचा समावेश आहे

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं, “ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.” तसेच किरीट सोमय्या हे दिल्लीत एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी किरीट सोमय्या आता आरोपांचा कुठला नवा बॉम्ब फोडतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

साोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’ मध्ये कोणाचा समावेश?

१. अनिल परब

२. संजय राऊत

३. सुजीत पाटकर

४. भावना गवळी

५. आनंद आडसूळ

६. अजित पवार

७. हसन मुश्रीफ

८. प्रताप सरनाईक

९. रवींद्र वायकर

१०. जितेंद्र आव्हाड

११. अनिल देशमुख

१२. नवाब मलिक

 

Share