परबांच्या अनधिकृत रिसॉर्ट कारवाईसाठी सोमय्या रत्नागिरीत दाखल

मुंबईः ठाकरे सरकारने परिवहन मंत्री अनिल परब यांना वाचवायचा प्रयत्न केला तर त्यांना अनिल देशमुखान सारखे तुरुंगात जावे लागेल, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले. अनिल परबांचा यांनी कोरोना काळात बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला तो रिसॉर्ट तोडलाच पाहिजे, असे सोमय्या म्हणाले. अनिल परब गुन्हेगार आहेत. तसेच या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी मी रत्नागिरीला जात आहे. असे सोमय्या यांनी सांगितले.

अनिल परब यांनी कोरोना काळात बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला. सचिन वाझेच्या खंडणीच्या पैशातून हा रिसॉर्ट बांधला का? महाराष्ट्र कॉन्स्टिट्यूशन बोर्डाने हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता हे रिसॉर्ट पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहे. त्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करयाचा आहे, असे सांगतानाच मी रत्नागिरीला जात आहे. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार आहे, असंही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

अनिल परबांचा रिसॉर्ट तोडलाचे पाहिजे त्यासाठी जिल्हाधिकारी , जिल्हा अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे. अनिल परब गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. केंद्र सरकारने आदेश दिलेत तोडक कारवाई कधी करणार? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात फायनल ऑर्डर आता आली आहे.ठाकरे सरकार का कारवाई करत नाही?, असा सवाल त्यांनी केलाय. रिसॉर्ट बांधणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

Share