केंद्राचं पाप झाकण्यासाठी सोमय्यांची चमकोगिरी – अमोल मिटकरी

मुंबई : भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यारून राजकीय वातावरण चागलंच तापलं आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचं दापोली तालूक्यातील मुरुड इथलं रिसाॅर्ट बेकायदा असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे. तसेच केंद्राचं पाप झाकण्यासाठी सोमय्यांनी चमकोगिरी सुरु असल्याचेही आ. मिटकरी म्हणाले.

यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, केंद्र सरकारने गोरगरिबांच्या जिवनावश्यक वस्तू डिझेल ,पेट्रोल व गॅस आज पासून प्रचंड प्रमाणात वाढवल्या त्यामुळे अस्वस्थ झालेल्या किरीट सोमय्यांना कोकणात जाऊन राजकारण करायला संधी मिळाली. तात्पर्य केंद्राचं पाप झाकण्यासाठी सोमय्यांची चमकोगिरी असे मिटकरी म्हणाले आहेत.

दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भाजप नेत्यांकडून आरोप करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीये. त्यातच आता किरीट सोमय्या हे थेट अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्याचं म्हणत दापोलीला निघाले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा एकदा होताना दिसत आहे.

Share