सोनिया गांधींना कोरोनाची लागण; ईडीच्या चौकशीचं काय होणार?

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. गांधी यांना बुधवारी सौम्य ताप आला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली होती. आज या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधींनी सध्या स्वत:ला आयसोलेट केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक आहे. सुरजेवाला यांनी आशा व्यक्त केली की ८ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात ही चौकशी होणार आहे. सोनिया गांधी दोन-तीन दिवसांत बरे होण्याची अपेक्षा आहे.

ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणार का?

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व पक्षाचे खासदार राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी समन्स बजावले आहेत. ‘नॅशनल हेरल्ड’ या वृत्तपत्रासंबंधी कथित आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ‘ईडी’ने या दोघांना ही नोटीस बजावली आहे. सोनिया यांना आठ जून रोजी, बोलावले आहे. ‘ईडी’ने पाठवलेल्या समन्सनुसार सोनिया गांधी आठ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली होती. मात्र, त्याआधीच सोनिया गांधी यांना कोरोनाने गाठल्यानं त्या चौकशीसाठी जाणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

Share