नांदेडहून मुंबई, कोल्हापूरसाठी विमान सुरू करा – अशोक चव्हाण

नवी दिल्ली : नांदेड व कोल्हापूर ही दोन्ही शहरे देशातील प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा आणि कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक प्रवास करत असतात. त्यामुळे या दोन्ही शहरांची विमानसेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे नांदेड-मुंबई व मुंबई-कोल्हापूर ही विमानसेवा ट्रुजेटऐवजी इंडिगो किंवा एअर इंडियासारख्या कंपनीकडे सोपवण्याची मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी भेट घेऊन केली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांना निवेदन देत नांदेड वरून मुंबईसह, हैद्राबाद, नवी दिल्ली, अमृतसर, चंदीगड, पुणे, शिर्डी, नागपूर व कोल्हापूरसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी केली. दरम्यान, या भेटीनंतर शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिंदे यांनी म्हटले आहे की, देशाच्या नकाशावरील नांदेड शहराचे स्थान महत्वपूर्ण असल्याची मला जाणीव आहे. येथील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मी  स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान,देशाच्या नकाशावर नांदेड शहराचे स्थान महत्वपूर्ण असल्याची मला जाणीव असून, येथील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन, असा शब्द नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला आहे. आज सायंकाळी नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीत त्यांनी ही सकारात्मक भूमिका घेतल्याचे चव्हाण म्हणाले.

Share