शैक्षणिक वर्ष संपल तरीही विद्यार्थी शिष्यवृतीच्या प्रतीक्षेत

महाविद्यालयात शिकत असलेल्या मागास प्रवर्ग, भटक्या जाती विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दरवर्षी समाजकल्याण विभागांतर्ग शिष्यवृत्ती मिळते. याही वर्षी विद्यार्द्यलयीन स्तरावर अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित महाविद्यालयाकडून समाजकल्याण विभागाकडे तत्काळ अर्ज पोहोचणे महत्त्वाचे आहे. परंतु, आजमितीला मागासवर्गीय प्रवर्गातील तब्बल बारा हजारांहून अधिक अर्ज महाविद्यालयीन स्तरावरच पडून असल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

 याबरोबरच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट शिष्यवृत्ती दिली जाते. दरम्यान, महा डीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्जही दाखल केले. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली नाही.

ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसीचे ७ हजारांहून अधिक अर्ज पेंडिंग : अकरावी ते पदवीधर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी इतर मागास प्रवर्ग, विशेष आर्थिक मागास प्रवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षांत महा डीबीटी पोर्टलवर ४० हजार ४७९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.

त्यापैकी काही त्रुटींमुळे ५ हजार ९५ अर्ज रद्द झाले. उर्वरित ३५ हजार ३८४ अर्जांपैकी २६ हजार ६७२ अर्ज महाविद्यालयाने मंजूर केले. मात्र, अद्यापही महाविद्यालयीन स्तरावर ७ हजार १८४ अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणे बाकी आहेत.

यंदा अनुसूचित जाती प्रवर्गातील ३६ हजार १६७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ५ हजार १०४ अर्ज रद्द झाले. उर्वरित ३१ हजार ६३ अर्जांपैकी २५ हजार १२५ अर्ज वरिष्ठ कार्यालयापर्यंत आले. मात्र अद्यापही ४ हजार ९४१ अर्ज महाविद्यालयीन स्तरावर पेंडिंग आहेत. एकूण मागास प्रवर्गातील १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाच्या लॉगिनमध्येच असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपले आहे तरीसुद्धा शिष्यवृत्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

Share