मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज कोरोनासंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर पाच मोठे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, फेरीवाले, नक्षलग्रस्त भागाशी संबंधित तीन निर्णय मोदी सरकारने घेतले असून, जम्मू-काश्मीरमध्ये वीजनिर्मिती केंद्र उभारणे आणि टपाल कार्यालयाच्या वेतन बॅंकेचा विस्तार करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

पहिला निर्णय : जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील ५४० मेगावॅट क्षमतेच्या क्वार हायड्रो पाॅवर प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पात १९७५ दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे विजेच्या बाबतीत जम्मू-काश्मीर स्वयंपूर्ण केले जाणार आहे.

दुसरा निर्णय : पंतप्रधान स्वनिधी योजनेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामध्ये फेरीवाल्यांना जो निधी दिला जात आहे, तो २०२४ पर्यंत दिला जाणार आहे.

तिसरा निर्णय : रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महागाईचा परिणाम खतांच्या किमतीवर पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

चौथा निर्णय : १० राज्यांतील नक्षलग्रस्त भागातील जवळपास २५४२ मोबाईल टाॅवर टू-जीवरून ४-जी लेस केले जाणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २४२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.

पाचवा निर्णय : हा निर्णय टपाल कार्यालयाच्या वेतन बॅंकेबाबत आहे. ग्रामीण भागात बॅंकिंग सुविधा मिळण्यासाठी तेथील महिलांना मोठ्या प्रमाणात वेतन बॅंकेशी जोडले जावे, या उद्देशाने बॅंकेचा विस्तार केला जाणार आहे.

Share