मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार(Bhima Koregaon violence) प्रकरणी शरद पवार(Sharad Govindrao Pawar) यांना न्यायालयाने साक्ष नोंदवण्यासाठी समन्स बजावला आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. त्या प्रकरणी चौकशी करून शरद पवार हे आपली साक्ष नोंदवणार आहेत. यासंदर्भात त्यांना समन्स बजावण्यात आला आहे. पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
Koregaon Bhima enquiry Commission gives its schedule for hearings between 21-25 Feb in which NCP chief Sharad Pawar listed for hearing on 23-24 Feb as witness. Then Pune Rural SP Suvez Haque & ex-Pune city Addl CP Ravindra Sengaonkar also listed: Commission lawyer Ashish Satpute
— ANI (@ANI) February 9, 2022
या आधीही जुलै महिन्यात शरद पवार यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आता पुन्हा एकदा २३ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधीक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे.
भीमा कोरेगावच्या लढाईच्या स्मरणार्थ एल्गार परिषदेच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी गावात हिंसाचार झाला होता. काही संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. नंतर जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये, सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन, अरुण फेरेरा, वेर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि वरवरा राव या नऊ कार्यकर्त्यांना हिंसाचारात अटक करण्यात आली.