‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’,राऊतांच्या पत्राला भाजपचा पलटवार

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Rajaram Raut)  यांनी काल उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू(venkaiah naidu) यांना पत्र लिहीत भाजपवर निशाणा साधला आहे. यामुळे राज्यातील राजकारणात चांगलेच तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. तसेच राऊत यांनी मुंबईत फक्त शिवसेनाच दादा असल्याच विधान देखील केलं आहे.राऊत म्हणाले की ,आम्ही जर तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांना(devendra fadnavis)  माहितीये मी काय बोलतोय ते. यातून त्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला आहे.यावर भाजपकडून प्रत्युत्तर देत खोचक शब्दात टिका करण्यात आली आहे.

राऊतांनी केलेल्या टिकेवर भाजपने सडेतोड उत्तर देत म्हंटल आहे की, माननीय संजयजी राऊत एवढ फ्रस्ट्रेशन तब्येतीला चांगल नाही त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. तुमचे बंधू म्ंत्री होतील ,तुम्ही देखील सामनाचे मुख्यसंपादक व्हाल, परंतू सध्या तुमची स्थिती दोन्ही घरचा पाहूना उपाशी अशी झाली आहे. तुमच्यावर ईडीने(Directorate of Enforcement)  कारवाई केली तरी ती किरकोळ आहे आणि उरला प्रश्न ५५ लाखांचा तर तुम्ही ते चुकते कराल. अश्या खोचक शब्दात भाजपाने राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Share