बॉलिवूडमध्ये सध्या एक मुद्दा चांगलाच गाजत आहे आणि त्यावर चर्चा होत आहे तो म्हणजे सुशांत सिंग राजपूत. सुशांतच्या बहिणीने पंतप्रधान मोदींकडे आपल्या भावला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुशांतच्या मृत्यूनंतर CBI लवकरच मोठे खुलासे करणार असल्याची बातमी समोर आली आहे. सुशांत एक आउटसाइडर अभिनेता होता आणि त्याला बॉलिवूडमधून त्रास दिला गेल्याची चर्चा अनेक वेळा होते. याच त्रासाला कंटाळून सुशांतनं आत्महत्या केल्याचं बोललं जातं. आता याविषयीच बॉलिवूडच्या एका अभिनेत्यानं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. सुशांतच्या मृत्यूविषयी त्यानं अनेक खुलासे करत त्याला इंडस्ट्रीतील काही लोकांकडून कसा त्रास सहन करावा लागला याविषयी देखील खुलासा केला आहे. ‘सोनचिरिया’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची विज्ञान, विशेषत: भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राची आवड त्याच्या सहकलाकारांना स्पष्ट झाली. सुशांतसोबत या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या रणवीर शौरीने अलीकडेच सेटवर दिवंगत अभिनेत्यासोबत शेअर केलेल्या सौहार्दाची आठवण करून दिली. मनापासून दिलेल्या मुलाखतीत, रणवीरने त्यांच्या मैत्रीचे आणि भौतिकशास्त्रावरील त्यांच्या परस्पर प्रेमावर त्यांनी निर्माण केलेले गहन संबंध प्रतिबिंबित केले.
रणवीर शौरीने निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महेश भट्ट यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर होता, मात्र नंतर त्यांना भडकावलं गेलं, असं तो म्हणाला. इतकंच नव्हे तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख करत माझ्यासोबतही असंच घडल्याचा आरोप त्याने केला आहे. फिल्म इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दलही त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. ऑफ द रेकॉर्ड प्रत्येकजण या गोष्टीला स्वीकारेल, असंही तो म्हणाला. रणवीरने आतापर्यंत ‘खोसला का घोसला’, ‘एक था टायगर’, ‘टायगर 3’, ‘कडवी हवा’, ‘भेजा फ्राय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. एकेकाळी तो महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टला डेट करत होता.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर शौरी म्हणाला, “माझ्या मनात महेश भट्ट यांच्याविषयी खूप आदर होता. मात्र जोपर्यंत तो किस्सा झाला नव्हता, तोपर्यंतच. मी त्यांची मुलगी पूजा भट्टला डेट करत होतो. वास्तवात त्यांच्याबद्दल माझ्या मनात जो आदर होता, त्याचा वापर करून ते माझी फसवणूक करत होते. माझ्यासोबत ते दुटप्पी वागत होते.”माझी सगळ्या बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात होता. पूजा भट्टला डेट केल्यानंतर मला काही गोष्टी कळल्या. मात्र, त्यावर मी कधीही उघडपणे बोलले नाही.’ असा शॉकिंग खुलासा या अभिनेत्यानं केला आहे. यापूर्वी पूजा भट्ट आणि महेश भट्टने इतका त्रास दिला होता की मी देश सोडून गेलो होतो.’ असं देखील रणवीरनं सांगितलं होतं.
याविषयी बोलताना रणवीर शौरी म्हणाला, ‘एखाद्याचं करिअर खराब करणं आणि त्याला सगळ्यांपासून बाजूला ठेवणं ही आपल्या इंडस्ट्रीमध्ये अगदी सामान्य गोष्ट आहे. माझ्याविरुद्ध कट रचण्यात आला होता. सुशांत सिंग राजपूतसोबतही असंच घडले. हे सगळे कोणीही ऑन रेकॉर्ड सांगणार नाही, पण सर्वजण ऑफ रेकॉर्ड सगळ्या गोष्टी कबूल करतील. मी ऑन रेकॉर्ड सांगू शकतो, मला कसलाच प्रॉब्लेम नाही. एखाद्याविरुद्ध कट रचने, त्याला बाजूला करणे, त्याचा अपमान करणे या सगळ्या गोष्टी इथंच घडतात आणि हे सत्य आहे.’ असा खुलासा रणवीरने केला आहे.