कॉंग्रेसच्या घटनेची झेरॉक्स कॉपी काढून ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची घटना करावी – चंद्रशेखर बावनकुळे

नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंनी स्वत:चा संपवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सर्व करून टाकल्या आहेत. आता फक्त काॅंग्रेसच्या पक्षाच्या घटनेची झेराॅक्स काढून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची करावी. एवढंच शिल्लक राहिलंय, बाकी सर्व झालंय, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लागावला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का? आंबेडकरांनी सगळी मते त्यांच्याकडे घेतली आहेत का? मी परवा आदिवासी नंदूरबारमध्ये होतो. ७५ हजार आदिवासी कुटुंबांनी धन्यवाद मोदीजी हे पत्र लिहिलं. त्यांनी हे पत्र का लिहिलं? आदिवासी समाजातील एका महिलेला राष्ट्रपती केलं म्हणून त्यांनी मोदींचं धन्यवाद केलं.

आदिवासी समाज कोणाची जहागिरी आहे का? तो समाज आहे आणि समाज म्हणूनच निर्णय करत असतो. तो कोण्या नेत्याच्या म्हणण्यानुसार निर्णय करत नाही. त्या समाजाला आपल्या हिताचं काय हे कळतं. मोदी आपलं हित जोपासत आहेत हे त्यांना कळतं. मागासवर्गीय समाजालाही वाटतं की मोदी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर संविधानाचं रक्षण करत काम करत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही,असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

Share