ठाकरे सरकार ‘या तारखेला’ पाय उत्तर होणार; चंद्रकांत पाटील यांचं भाकीत

पुणे : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरुन जावे लागेल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटंल आहे.

महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते. दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांनी सांगिलते की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्या मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणाला होता. या गंभीर आरोपांनंतर आघाडीच्या नेत्यांना काहीही संवेदनशीलता दाखवला नसली तर ही प्रकरणे गुन्ह्यांची आहेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायलयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तला या गंभीर प्रकरणांबाबत न्यायलय न्याय देईल, अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल, असा दावा पाटील यांनी केलाय.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड व एकूण संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांचा सत्कार करुन पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार असा आपला सवाल आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी केली नाही तर आपण न्यायालयात जाऊ.

पुण्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने गोमुत्र आणि गुलाबजल टाकून त्या पायऱ्या स्वच्छ केल्या. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून आपल्याला खूप आनंद झाला.

Share