‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : प्रेक्षकांच्या आवडिचा लाढका शो कोण होणार करोडपती चा नवीन पर्व लवकरच तुम्हच्या भेटीस येत आहे. मनोरंजन आणि ज्ञान यांचा संगम घडवून आणारा, तुमचे ज्ञान तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचवू शकते. या साठी या खेळात सहभागी व्हावे लागेल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २३ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होण्यासाठीच्या नावनोंदणीला सुरुवात होणार आहे. १४ दिवस आणि १४ प्रश्न असे याचे स्वरूप आहे. ७०३९०७७७७२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लिव्हवर नावनोंदणी करून या खेळात सहभागी होता येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

https://www.instagram.com/p/CZwvwp_uLWC/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. आपली देहबोली आणि आपला आवाज यांमुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. प्रत्येक खेळात कोणी जिंकतं किंवा कोणी हरतं, पण या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो, असे सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहे.

Share