हिंदुत्वाचे कैवारी फक्त तोंडाने नुसतेच बोलणार की…मनसेचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील सर्वच मदरशांत राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण बोर्डाने यासंबंधीचे आदेश जारी केलेत. दरम्यान, यावरुन मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शालिनी ठाकरे यांनी ट्वीट म्हटलं की, यूपीमध्ये अजाण,रस्त्यावरील नमाज आणि आता मदरशात राष्ट्रगीत पण महाराष्ट्रातील महाभकास आघाडीला भोंगे उतरवायला कायदा लागतो आणि आता मदरशात राष्ट्रगीत सक्तिसाठी पण कायदा लागणार का..? हिंदुत्वाचे कैवारी फक्त तोंडाने नुसतेच बोलणार की कृती पण करणार. आ देखे जरा किसमें कितना है दम. अस म्हणंत शालिनी ठाकरे यांनी सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान २४ मार्च रोजी उत्तर प्रदेशातील मदरशा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ९ मे रोजी याबाबतचा आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू होण्यापूर्वी गायल्या जाणाऱ्या धार्मिक प्रार्थनेबरोबरच राष्ट्रगीत (जन-गण-मन) देखील गायले जाणार आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एस. एन. पांडे यांनी  सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिका-यांना याबाबत आदेश जारी केला आहे. पांडे यांनी आदेशात म्हटले आहे की, २४ मार्च रोजी बोर्डाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्राथनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे.

Share