राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

पुणेः  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद  येथे आयोजित श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्या वरुन राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध  केला असुन आज पुण्यात आंदोलनही सुरू आहे. तर संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली असून सोशल मीडियातून देखील राज्यपालांवर टीकेचा भडिमार होत आहे. राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

 

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच ट्वीट करत आंदोलनाची घोषणा केली आहे. प्रशांत जगताप म्हणाले, “अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (२८ फेब्रुवारी २०२२) सकाळी १०.३० वाजता पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात येईल.

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असते. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे

 

Share