जो हा अपमान सहन करत आहे ते XX ची अवलाद – संजय राऊत

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्टिट केला आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा एकेरी शद्बात उल्लेख केला. आम्ही पूर्वीपासून या मुद्द्यावर लढतच आहोत. मात्र जे सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? आम्हाला असं वाटत केंद्रातला एखादा मंत्री तरी या विषयावर राजीनामा देऊन महाराष्ट्रात परत येईल. जो हा अपमान सहन करत आहेत ते गांंxxची अवलाद आहेत. असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यपालांचं नेमकं वक्तव्य काय?
राज्यपालांनी हिंदीत याबाबत एक वक्तव्य केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. “सब लोग कहते हैं की शिवाजी होने चाहीए, चंद्रशेखर होने चाहीए, भगतसिंह होने चाहीए, नेताजी होने चाहीए, लेकीन मेरे घरमें नही तो दुसरे के घरमे होने चाहीए”, असं विधान राज्यपाल संबंधित व्हिडीओत करताना दिसत आहेत.

Share