‘जिंदादिल स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा’, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्लीः गोल्डन सिंगर’ बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहरी यांचे निधन झाले. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, बप्पी लहरी यांचे संगीत सर्वसमावेशक, विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्या संगीताचे चाहते राहिले आहेत. त्यांचा जिंदादिल स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यां प्रति संवेदना. ओम शांती, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Share